प्रतिनिधी , सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज दिवस असल्याने सिल्लोड शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध ग्रामपचायती साठी अर्ज केलेल्या नागरिकांनी सकाळ पासून मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील खंडाळा, चीचंखेडा , पिंपळगाव घाट शेखपुर, खातखेडा, सासुरवाडा व मुकपाठ येथील ग्राम पंचायत सर्वच सदस्य हे बिनविरोध केल्या आहेत. सिल्लोड तालुक्यातील इतर ग्रामपंचयात निवडणुकीत 58 जागा ग् बिन विरोध निघाल्या असल्याची अधिकृत माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
