प्रतिनिधि , लातूर : लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एका व्यापाऱ्याला मारण्यासाठी हत्यारे घेऊन आलेल्या सुपारी किलर यांना चारचाकी गाडीसह त्याब्यात घेऊन निलंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहरातील जुन्या गाडीचे व्यवहार करणारे व्यापारी उमर करीम पटेल शेख राहणार खोरे गल्ली लातूर यांच्या सांगण्यावरून निलंगा शहरातील एका व्यापाऱ्याकडून पैसे वसूल करण्यासाठी उमर अब्दुलसाब शेख राहणार हत्तेनगर ५ नंबर रोड लातूर यांच्यासहलातूर येथील अहमद जिलानी शेख,अखील रहेमानसाब बिरादार, विजय साहेबराव करवंजे, महेश वसंत वाघमारे, नागेश लक्ष्मण सुरवसे हे पाचजन निलंगा शहरातील दत्त नगर प.स.कार्यालयासमोर एम.एच.२४ सी.९३६३ या नंबरची इनव्हा गाडी मध्ये बसले होते. निलंगा येथील दिशान देशमुख राहणार यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे पाच सुपारी किलर आले होते. खब-याकडून निलंगा पोलिसांना माहिती कळताच स्वत: पोलिस निरिक्षक अनिल चोरमले व शितल सिंदाळकर राजकुमार नागमोडे, प्रणव काळे,हणमंत पडीले यानी फौज फाट्यासह सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या व सदरील पाच आरोपीना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील पाचजन हे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक असून त्यांच्याकडे दोन चाकू एक गुप्ती एक सुत्तर यासह पाच लागडी दांडके सापडले आहेत, त्यांच्यावर लातूर येथील पोलिस ठाण्यात अनेक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी या गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना सापळा रचून अटक केली नसती तर शहरात मोठा अनर्थ घडला असता.निलंगा व लातूर येथील दोन्ही व्यापारी हेजुन्या गाड्यांचा व्यापार करत होते.परंतु एका गाडी मध्ये निलंगा येथील व्यापारी दानीश देशमुख यांना तोटा झाला व यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.सदरील दोन्ही व्यापारी हे भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.पैशाच्या व्यवहारातून दोन भाऊन एकमेकांच्या जीवावर बेतले होते या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली होती.
