जनतेज न्युज

स्वस्तात मिळणार कोरोनावरची लस- सीरम इन्स्टिट्यूट

प्रतिनिधी , पुणे : कोरोनाची (Corona) लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमधील संस्थांसोबत पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) ऑक्सफर्डच्या मदतीने काम करते आहे. ही लस भारतात २२५ ते २५० रुपयांत मिळू शकेल, अशी माहिती ‘सीरम’ने पत्रकातून दिली आहे.

लस सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर सर्व जगात गरिबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने सीरम इन्स्टिट्यूट काम करते आहे.

सीरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत काम करत आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. GAVI मार्फत निधी सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सीरम इन्स्टिट्यूट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोज पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स (साधारण २२५ ते २५० रुपये) असेल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोनिल औषधाचा दावा पतंजलीच्या अंगलट ; न्यायालयाने ठोठावला १० लाखांचा दंड