प्रतिनिधी , जालना : ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील शाळा,कोचिंग क्लासेस, हॉस्टेल बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचा निंर्णय
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे जालना जिल्ह्यातील १० वी,१२ वीचे वर्ग वगळता शाळा,हॉस्टेल,आठवडी बाजार बंद खाजगी शाळा,कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निंर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय.आज जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.या बैठकीत हा निंर्णय घेण्यात आला. जालना शहरातील व्यापारी,भाजीपाला विक्रेत्यांची अँटीजन टेस्ट घेण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिल्यायत.विदाऊट मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके नेमण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १४ हजार ४३२ वर पोहचली असून उपचारानंतर १३ हजार ६६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय.सध्या ३८७ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात ३८० रुग्णांचा मृत्यू झालाय.
