प्रतिनिधी, नागपूर : 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 117 आदिवासी जोडपी विवाह बंधनात बांधली जाणार आहे. यांचा सामूहिक विवाह सोहळा 13 मार्च होणार .. असून यासाठी गडचिरोली पोलिसांचा मोठा सहभाग असून त्यात मैत्री परिवार या सामाजिक संस्थेचा पुढाकार आहे. या संदर्भात मैत्री परिवार आणि गडचिरोली चे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी पुढाकार घेतला. ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात आले असून आता ज्याचा विवाह केला जाणार आहे त्यांच्या साठी सुद्धा रोजगाराची संधी निर्माण केली जात असून गडचिरोली या मागास जिल्ह्यातील युवकांना पुढाकार घेतला जात आहे .. हा विवाह सोहळा 13 मार्च ला होणार आहे ..यात अतिदुर्गम भागातील युवक असल्याने त्यांच्या पद्धतीने हा विवाह सोहळा होणार आहे ..
