प्रतिनिधी, धुळे : धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार विश्वासराव रंधे यांच्या संकल्पनेनुसार 13 वा व 14 वित्त आयोगाच्या रकमेतून आदिवासी व पेसा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 8 रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या ऐतिहासिक निर्णय धुळे जिल्हा परिषदेने घेतला आहे. या आठ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज धुळे जिल्हा परिषद येथे पार पडला.
मागील 11 फेब्रुवारी 2021 रोजी ह्या रुग्णवाहिका घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या रुग्णवाहिका खरेदीची प्रशासकीय मान्यता 17 ऑगस्ट 2021 रोजी देण्यात आली. 19 जानेवारी 2022 रोजी जि.प सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते रुग्णवाहिका खरेदीचा कार्यादेश बाबत ठराव करण्यात आला. त्यानुसार आज रुग्णवाहिका हस्तातरण सोहळा धुळे जिल्हा परिषद येथे खासदार डॉ सुभाष भामरे आणि माजी शिक्षण मंत्री तथा आमदार अमरीश भाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
