जनतेज न्युज

२१ वी ऊस परिषद येत्या १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणार- महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष

प्रतिनिधी, सांगली : २१ वी ऊस परिषद येत्या १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होणार आहे या ऊस परिषदेचे निमंत्रण आणि जागर एफ आर पी चा संघर्ष ऊस दराचा ही यात्रा माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काढण्यात येणार आहे ही यात्रा सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा आणि पलूस तालुक्यातून जाणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.या यात्रेची सुरवात पत्रीसरकारचे जनक, क्रांतीसिह नाना पाटील यांच्या जन्मगावी येडेमच्छिद्र येथून सुरवात दि २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता येडेमचींद्र जाहीर सभा तर ,२८ सप्टेंबर पलुस तालुक्यातील कुंडल तर शिराळा तालुक्यात कांदे येथे ४ ऑक्टोबर रोजी जाहीर सभा होणार असल्याचेही खराडे यांनी सांगितले. खराडेपुढे म्हणालेकी ऊस शेती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत पण त्या प्रमाणात एफ आर पी मध्ये वाढ होताना दिसत नाही वाढलेल्या प्रचंड रासायनिक खतांची ,मजुरी, वीज, पाणी पट्टी, औषधे यांच्या किमती ज्या पटीत वाढल्या आहेत त्या पटीत एफ आर पी मध्ये वाढ करा याची जनजागृती करण्यासाठी २४ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा काढण्यात येणार आहे सांगली जील्यात ही यात्रा २७ सप्टेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्म भूमी म्हणजेच येडेमच्छिद्र येथे येणार आहे त्या ठिकाणी सायकाळी ७ वाजता राजू शेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे क्रांतिसिंह नाना यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जाहीर सभा होईल त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७वाजता ही यात्रा क्रातिभुमी कुंडल येथे येईल त्या ठिकाणी क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या समाधीस अभिवादन करून जाहीर सभा होणार आहे त्यानंतर पुन्हा ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात जाणार असून यात्रेची सांगता ४ऑक्टोबर रोजी शिराळा तालुक्यातील कांदे या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी रात्री सात वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे प्रचंड प्रमाणात म्हणजेच १५० ते २०० टक्के खताच्या किमती वाढल्या आहेत पाणी पट्टी आणि वीज दर दुप्पट झाले आहेत मजुरी, अवजारे यांच्या किमती वाढल्या आहेत मात्र एफ आर पी मध्ये केवळ ७५ रुपये वाढ केली आहे म्हणूनच या यात्रेचे नियोजन केले. एकरकमी एफ्आरपी, शेतकऱ्याच्या मध्ये जनजागृती करून केंद्र आणि राज्य सरकार व साखर सम्राटाच्या विरोधात रान उठविण्यासाठी या यात्रेत सहभागी होवून ही यात्रा यशस्वी करावी असे आवाहन खराडे यांनी केले आहे.