जनतेज न्युज

28 तारखेला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार आहोत मार्च महिन्यात ही भरती होईल – राजेश टोपे

प्रतिनिधी , मुंबई : जीडीपी च्या 5 टक्के रकमेचा खर्च झाला पाहिजे पण तो फक्त 1 टक्का खर्च केला जातो पण यावेळी हा निधी वाढवावा अशी आमची मागणी आहे.
राज्यातील कोरोना संख्या सहाशे ने वाढली चार हजारावर डेली आकडा पोचला आहे, कोरोना वाढत आहे, विदर्भ आणि मुंबईत आकडे वाढत आहेत त्यामुळे आजपासून कोरोना व्हाक्सिन दुसरा डोस द्यायला सुरुवात झाली आहे तसेच 4 हजार कोटी बांधकामावर खर्च होत आहेत.
जीडीपी च्या 5 टक्के रकमेचा खर्च झाला पाहिजे पण तो फक्त 1 टक्का खर्च केला जातो पण यावेळी हा निधी वाढवावा अशी आमची मागणी आहे.
28 तारखेला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार आहोत मार्च महिन्यात ही भरती होईल
एकूण 17 हजार जागा रिक्त जागा आहेत, त्यापैकी साडेआठ हजार जागा भरल्या जातील त्यातील पाच हजार जागा सुरुवातीला भरल्या जातील
30 कोटी लोकांना लस देणार असं केंद्राने सांगितलं आहे, पण उर्वरित लोकांना कधी लस देणार हा प्रश्न आहे, उर्वरित लोकांसाठी लसिकरण सुरु करावं आणि गरीब लोक आहेत त्यांना मोफत लसिकरण करावं ही आमची मागणी आहे