जनतेज न्युज

31 डिसेंबरच्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका सज्ज-अभिजीत बांगर.

प्रतिनिधि , नवी मुंबई : 31 डिसेंबरच्या अनुषंगाने नवी मुंबईत कोविडच्या पार्श्वभूमीवर गणपती व दिवाळीत जी काळजी घेतली होती, तीच काळजी घेण्यास नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. शासनाने जे नाईट कर्फ्युबद्दल आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी नवी मुंबई शहरात होत आहे. तसेच रेस्टॉरंट पब या ठिकाणी नाईट कर्फ्युचे पालन सक्तीने केले जावे, असे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. तसेच युकेमधून पसरणाऱ्या विषाणूच्या दृष्टीने देखील नवी मुंबईत सर्व नियमांचे पालन केले जात आहे.