जनतेज न्युज

500रुपयासाठी नवजात बाळ देण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची अडवणूक… तर प्रसूतीसाठी 1200 रुपयांची मागणी… चौकशी समिती अहवाल पाठवणार…

प्रतिनिधी , बुलडाणा : चिखली सरकारी रुग्णालयात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेकवेळा मरणयातना सोसाव्या लागतात. येथील ग्रामीण रुग्णालयातही असाच प्रकार उघडकीस आला आहे.कामचुकारपणाचा कळस व पैशाच्या लालसेपोटी महिलेच्या प्रसुतीसाठी केवळ 500 रूमयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक केल्याचा प्रकार 19
डिसेंबरच्या रात्री घडला आहे. तर 21 डिसेंबरच्या रात्री प्रसुती वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे.नाईलाजाने गरोदर महिलेची प्रसुती तिच्या आईलाच करावी
लागली आहे.
पार्वती सुरडकर यांनी आपल्या गरोदर मुलीला १९ डिसेंबरच्या रात्री९ चिखली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान रात्री २ वाजेच्या सुमारास प्रसुती वेदना सुरू झाल्याने रूग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी १२०० रुपयांची मागणी केली.मुलीचा त्रास पाहता पार्वतीबाईनी ती मागणी मान्य केली. मात्र, प्रसुतीपश्चात त्यांच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी करण्यात आली.मोलमजुरीने उदरनिर्वात करणाऱ्या पार्वतीबाईकडे दीड हजार रुपयेच होते. अशा रात्रीच्या वेळस पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्या महिलेला पडला होता.तोच व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.मात्र, लालसेची परिसीमा
गाठलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी उर्वरित ५००
दे तेव्हाच बाळ देईल, अशी अडवणूक केल्यामुळे पार्वतीबाईनी लेखी तक्रार केली आहे.याच संदर्भात चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विभागाने तात्काळ समिती नेमून चौकशी सुरू केली आहे.