जनतेज न्युज

9 नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांचे घरासमोर आक्रोश आंदोलन…..

प्रतिनिधी, महाराष्ट्र: कोरोनाच्या या महामारीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अनेक कर्मचा-यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रवाशी वाहतूक सुरळीतपणे पार पाडली मात्र त्याच एसटी कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे वेतन मिळाले नसून महागाई भत्ता, दिवाळी उचल आणि दिवाळी भेट येत्या 7 नोव्हेंबर पर्यंत मिळाली नाही तर अन्यथा 9 नोव्हेंबरला एसटी कर्मचारी राज्यभर आपल्या घरासमोर आक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष यांनी दिली
याबाबतचे निवेदन राज्य सरकारला दिले असून त्यांच्या या आदेशानुसार 2 नोव्हेंबरला संघटनेच्या माध्यमातून तहसिलदार व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात येणार आहेत त्यानुसार येत्या 7 नोव्हेंबर पर्यंत सरकारने कर्मचा-यांना वेतन, महागाई भत्ता, दिवाळी उचल तसेच दिवाळी बोनस न दिल्यास एसटी कर्मचारी आपल्या घरामध्ये अथवा घरासमोर कुटुंबासह पगार दो अस आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे