प्रतिनिधी , नांदेड – शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी केंद्रसरकरच्या विरोधात घोषणा बाजी करत भोकर तहसील कार्यालया समोर भोकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भोकर विधानसभा वंचित बहुजन आघाडी नेते नामदेवराव आयलवाड, जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, मारोती चितळे यांनी उपस्थिती दर्शवली.
