प्रतिनिधी , पुणे : पूजा चव्हाण या अपघातग्रस्त युवतीला सामाजिक भावनेतून मदत करायला गेलेल्या नगरसेवक धनराज घोगरे यांना वानवडी पोलिसांनी नोटीस दिली आहे. या प्रकरणात ज्यांची चौकशी करण्याची गरज आहे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत जे मदत करायला पुढे गेले त्यांना नोटिस पाठविणे हे अन्यायकारक आणि चुकीचे आहे.या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे,आमदार सिद्धार्थ शिरोळे आज दुपारी 3.30 वाजता वानवडी पोलीस स्टेशन येथे निवेदन देणार आहेत,२८ दिवसांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या झाली,जवळ राहत असलेल्या आमचया नगरसेवकानी मदत केली,त्यात माणुसकी म्हणून मदत केली,या घटनेत एका मंत्र्याला राजनामा द्यावा लागला,त्यात पोलीस व व्यक्ती ला मदत केली,धनराज घोगरे ला वानवडी पोलिसांनी नोटीस दिली,भाजप कार्यकर्ते वर दबाव टाकत आहे हे सरकार,जनतेसाठी आम्ही तुरुंगात जाऊ,सरकार ला सांगू इच्छियो की आम्ही घाबरत नाही,मदत करणाऱ्याना पोलीस घाबरवतो आहे,आणि आरोपी मोकाट फिरत आहे.मोबाईल जमा केलेला आहे,घटनेवेळी काही नागरिकांना मिळाला तो पोलिसांना दिलेला आहे,लॅपटॉप होता की नाही माहिती नाही,पोलीसांनी जागेचा ताबा घेतला,मला ते खरच माहिती नाही,मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत…मी घाबरणार नाही किंवा कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही
