जनतेज न्युज

शॉटसर्कीटने आग लागल्याने दहा दुकाने जळूण लाखोंचे नुकसान , जिवीतहाणी नाही

प्रतिनिधी , उस्मानाबाद: उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील महावितरणच्या कार्यालयासमोरील शाँपींग सेंटरला अचानक लाईटच्या शाँटसर्किटने आग लागली यात दहा दुकाने जळून खाक झाले आहेत. दि.१४ /३/२०२१ रोजी दुपारी ढोकी येथील शाँपींग सेंटरला अचानक शाँटसर्किटने आग लागली यात दहा दुकाने जळून खाक होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जिवीत हाणी झाली नाही .दरम्यान आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होतो मात्र अग्निशामगच्या गाड्या पोहचेपर्यत ग्रामस्थांनी हि आग आटोक्यात आनली . घटनास्थळाला आ.कैलास पाटिल व आ. राणाजगजीतसिंह पाटिल यांनी भेट दिली असुन नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे .