प्रतिनिधी , नागपूर शहरात आज 15 मार्चपासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला. नागपुरात आज सकाळपासूनच लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. नागपूर आजपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हेरायटी चौकात जाऊन लॉकडाऊनचा आढावा घेतला. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच नागपूर शहारीत सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
