जनतेज न्युज

आम्ही अंधारात तर तुम्ही अंधारात स्वाभिमानीचे महावितरण कार्यालयात वीज बंद आंदोलन…

प्रतिनिधी , बुलडाणा : थकीत वीज बिल वसुली करता शेतक-यांचे कट करण्यात येत असलेले वीज कनेक्शन विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून अशा घोषणा देत बुलढाणा विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात वीज कनेक्शन बंद करून वीज बंद आंदोलन सुरू केले आहे..

राज्यात वीज बिलासंदर्भात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणी सुरू केले आहे .त्यांना आपल्या जनावरांसाठी पिण्याच्या पाणी हि देता येत नाही कारण वीज कनेक्शन कापले गेले आहे वीज कनेक्शन कापल्याने जनावरांना पाणी पाजता येत नाही.या होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे अधिक्षक अभियंता यांच्या कडे गेले असता आक्रमक होत बुलढाणा महावितरण कार्यालयातील बंद करुन वीज तोडलेले कनेक्शन जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत कार्यालयातील वीज सुरू करणार नाही तसेच आम्ही अंधारात तर तुम्ही अंधारात अशा घोषणा देत आंदोलन सुरू केले आहे..