प्रतिनिधी , केडीएमसीच्या दोन अधिका:यांना बांधकाम प्रकरणी 15 हजार रुपयांची लाच घेताना ठाणो एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे. आत्ता 37 अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. केडीएमसीमध्ये बांधकाम आणि बांधकामातून मिळणारा पैसा हा किती प्रमाणात वसूल केला जात आहे हेच यातून उघड होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा परिसरात राहणा:या एका सर्वसामान्य नागरीकाचे बांधकाम सुरु होते. या बांधकामासाठी महापालिकेच्या अधिका:यांनी त्या सर्व सामान्य नागरीकाकडे 2क् हजार रुपायंची मागणी केली. त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला. अखेर 15 हजार रुपये देण्याचे ठरले. हेच पंधरा हजार घेताना एसीबीच्या अधिका:यांनी प्रभाग अधिकारी कार्यालयात दोघांना रंगेहाथ पकडले. एसीबीची कार्यवाही सुरु आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत 37 अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. यामध्ये काही रुजू झालेले आाहेत. काही सेवानिवृत्त आहेत. धक्कादायक म्हणजे काही अधिकारी दोन वेळा लाच घेताना पकडले गेलेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका अनधिकृत बांधकामातून किती पैसा येतो. याचे हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळेच इतके अधिकारी एसीबीच्या जाळ्य़ात सापडले आहे.
