प्रतिनिधी , मुंबई : भांडुपच्या ड्रीम्स मॉल ला लागलेल्या भीषण आगीमध्ये या मॉलमध्ये असलेल्या सनराइज् या रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 69 रुग्णांची सुटका करण्यात आली आहे तर इतर पाच रुग्णांचा शोध सध्या अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत . ड्रीम्स मॉल च्या पहिल्या माळ्याला रात्री बाराच्या सुमारास ही आग लागली होती त्यानंतर या आगीचे लोट हे दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यंत पोहोचले आणि तिसर्या माळ्यावर असलेल्या सनराइज् रुग्णालयाला देखील आगीने आपल्या विळख्यात घेतले हे कोबीड रुग्णालय आहे . परंतु या रुग्णालयातील रुग्णांनी प्रसंगावधान राखून इमारतीच्या छतावर आसरा घेतला आणि अखेर या सर्व रुग्णांना ग्लायडर च्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले . ड्रीम्स मॉल मध्ये अनेक गाळे हे बंद अवस्थेत आहेत तसेच अनेक कार्यालय देखील सुरु आहेत त्यामुळे आग विझवताना मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा ही सुस्थितीत नसल्यामुळे अनेक अडचणींना अग्निशमन दलाच्या जवानांना सामोर जावं लागत आहे
ड्रीम्स मॉल मध्ये लागलेल्या आगीमध्ये सनराइज् रुग्णालयातील अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत परंतु आता या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय . या मॉल मध्ये नियमबाह्य पद्धतीने हे रुग्णालय सुरू असल्याची तक्रार याआधी इथल्या स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली होती . परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडून केली गेली नाही अखेर आज या मॉल मध्ये लागलेल्या आगीत अनेक निष्पापांचे बळी गेले त्याला जबाबदार कोण असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली आहे त्
दरम्यान या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला परवानग्या देताना आपण नेमक्या काय परवानग्या देतो याचे भान देखील ठेवलं पाहिजे आणि या घटनेची गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले .
यासोबतच परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी देखील घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला
