जनतेज न्युज

धारणीच्या न्यायालयात महिलांचे आंदोलन आरोपी dfo विनोद शिवकुमार ला आमच्या ताब्यात द्या- महिला संतप्त

प्रतिनिधी , अमरावती : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अखेर अमरावती जिल्ह्यातील हरीसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाळून आत्महत्या केल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटमधून अनेक गोष्टी समोर आल्यात.. dfo विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने धारणी पोलिसांनी शिवकुमार याना अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आज शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यात धडक देत आरोपी शिवकुमार ला ताब्यात देण्याची मागणी केली यावेळी आरोपींला कोर्टात नेत असतांना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या यावेळी पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला कोर्टात हजर केले,यावेळी ज्या वाहनांतून आरोपी विनोद शिवकुमार ला पोलीस धारणी न्यायालयाने घेऊन जात होते त्या वाहनाला महिलांनी पूर्णपणे घेरलं होते यावेळी मुर्दाबादच्या घोषणा महिलांनी लगावल्या होत्या दरम्यान यावेळी आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी खुद्द वनविभागाच्या महिला कर्मचारी वर्गाने केली यावेळी न्यायालयात आत मध्ये आरोपींना नेताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली,यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला आक्रमक झाल्या होत्या