जनतेज न्युज

कोरोनाच्या संकटात राजकारण नाही तर समाजकारण करण्याची वेळ – सुप्रिया सुळे

प्रतिनिधी , मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे . लॉकडाऊनमध्ये सगळेच जण घरी आहेत. अशावेळी अनेक नेते मंडळी देखील त्यांच्या घरी आहेत. नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. असं असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
कोरोनाच्या संकटात आम्हाला राजकारण करायचे नाहीय तर समाजकारण करायचं आहे. मोदीसाहेबांच्या सरकारच्या सूचनांचे पालन करून हातात हात घालून राज्यसरकार २४ तास दिलेल्या सूचना असतील किंवा आम्ही केलेल्या सूचना असतील त्याचे पालन करण्याचे काम करत आहोत. यानुसार अतिथी देवो भव म्हणत आपल्यासाठी आपल्या राज्यात येऊन काम करणारे प्रत्येकजण महाराष्ट्राच्या जडणघडणीत तयार झालेले मजुर असो किंवा अन्य कुणी त्यांचा मानसन्मान केला जात आहे. त्याला अन्नधान्याची मदत केली जात आहे. माझ्या महाराष्ट्रात कुणालाही उपाशीपोटी राहू देणार नाही,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझा मतदार संघ म्हणजे माझं कुटूंब आहे. नियम कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे.त्यामुळे सरकारने घरी राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मी देखील घरी आहे. आणि शरद पवारांनी देखील नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. आज ३० दिवस पूर्ण झालेत जेव्हा मी पूर्ण वेळ घरी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच सुप्रिया सुळे यांनी यांनी सगळ्यांना विनंती केली आहे की, कुणीही आजार लपवू नका. घरी राहा पण काहीही त्रास झाला तर उपचार घ्या. तसेच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी मी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. पुण्यात असा उपक्रम राबविण्यात आला आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबतही सुप्रिया सुळे या फेसबुक लाईव्हमध्ये बोलल्या. विद्यार्थ्यांना अभ्यास सतत करण्याचा यावेळी त्यांनी सल्ला दिला. या लॉकडाऊनमध्ये आपण ऐकटे नाहीत संपूर्ण जग आपल्यासोबत आहे. कंटाळा येणार नाही याची काळजी घ्या. लॉकडाऊननंतर अनेक बदल करावे लागणार आहे. बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.