प्रतिनिधी , राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर फक्त लॉक डाउन हाच पर्याय आहे, पण सरकार ने लॉकडावून खुशाल लावाव पण गरिबाच्या खात्यात पैसे टाकावे,त्यांचं वीज बिल माफ करा अशी मागणी अमरावत बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी केली, विधानसभेमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला होता की इलेक्ट्रिक बिल वर आम्ही स्थगिती देत आहे व लगेच अधिवेशन झाल्याबरोबर ही स्थगिती उठवली गेली व घरोघरी जाऊन लोकांच्या घरातील वीज तोडण्यात आली, त्यामुळे या लॉकडाऊन मध्ये सुशिक्षित बेरोजगार, मजूर वर्ग यांच्यावर उपसमारी ची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने खुशाल लॉकडावून लावा पण गरिबाच्या खात्यात पैसे टाकावे व वीज बिल माफ करावे अशी मागणी रवी राणा यांनी केली
