जनतेज न्युज

जालना : साष्टपिंपळगाव येथील दोन मराठा आंदोलकांची प्रकृती गंभीर.

प्रतिनिधी , जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील साष्टपिंपळगाव येथे गेल्या ८४ दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरु आहे.या आंदोलनातील आंदोलकांनी तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरु केलंय. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक होऊन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं आंदोलकांनी तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरु केलंय.या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून २ आंदोलकांची तब्बेत खालावली आहे. तब्बेत खालावलेल्या आंदोलकांच्या जीविताला धोका पोहचल्यास त्याची किंमत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री राजेश टोपे यांना चूकवावी लागेल असा ईशारा आंदोलकांनी दिलाय.