प्रतिनिधी , सोलापूर : कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार कऱण्यासाठी सोलापुरात पोलिस आयुक्तालयातर्फे कोव्हिड हॉस्पीटल सुरु करण्यात आलं आहे.
पोलिस मुख्यालयातील पोलिस पब्लिक स्कूलचे रुपातंर कोव्हिड हॉस्पीटलमध्ये करण्यात आलं आहे.
कोरोनाकाळापासून शाळा बंद असल्याने या इमारतीत 60 बेडचे सुसज्ज हॉस्पीटल तयार कऱण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे सर्व बेडसाठी ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या हॉस्पीटलमध्ये 2 सेमी आयसीयु तसेच 4 जनरल वार्ड असणार आहेत.
शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारावर या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहे. अवघ्या आठवडाभरात तयार कऱण्यात आलेले रुग्णालय आजपासून रुग्णसेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांनी दिली.
