प्रतिनिधी , उस्मानाबाद : लोकसभा अधिवेशनात ओबीसी स्वातंत्र जनगनना न करण्याचा ठराव पारित केला मग सुमित्रा महाजण समिती कशासाठी नेमली होती , ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राजनाथसिंगांनी शब्द दिला होता . शब्द हेच प्रमाण म्हणणारे आता काय झाले , देशात मनुवाद अनताय का ? ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणुन स्वतंत्र जनगनना नाकारणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार असा घनाघात मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक ओबीसी नेते तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख शंकरतात्या बोरकर यांनी करत ही सुरवात आहे , आक्रोश उफाळून आल्यास केंद्र सरकारला पळता भुई कमी पडेल असा इशारा ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव जागर मेळावा प्रसंगी बोलताना केला .
