प्रतिनिधी ,जळगाव: चोपडा तालुक्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे चारशे डोस आले होते ते डोस शहरातील उपजिल्हा रुग्णालय साठी 200 व नगरपालिका रुग्णालयासाठी दोनशे असे देण्यात आले होते लसीअभावी ग्रामीण भागात आज लसीकरण बंद होते चोपडा तालुक्यात आतापर्यंत 44000 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर दहा हजार नागरिकांनी लसीचे दोघं डोस घेतले आहे असे एकूण 54 हजार हजार लसीकरण तालुक्यात झाले आहे ग्रामीण भागात आदिवासी भागात शहरी भागात लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे तरी नागरिकांनी मास्क चा वापर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे सँनिटायझरचा वापर करणे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी उकळून प्यावे डेंगू चे लक्षणे आणि कोवीडचे लक्षणे जवळपास सारखे आहेत त्यामुळे कोणताही ताप असेल त्याची तपासणी करून घ्यावी लवकर उपचार करता येतो तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर.
