जनतेज न्युज

पूरग्रस्त भागातील स्वच्छतेचे पालक मंत्री ठाकूर यांच्याकडून निर्देश

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने स्वच्छता करून कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिले त्यांनी आज जिल्ह्यातील दहिगाव रेचा राईचा या पूरग्रस्त गावाची पाहणी केली.दहीगाव रेचा या गावात बंधारा फुटल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती अनेक घरांची पडझड तसेच शेतीचे नुकसान झाले आहे तसेच गावांमध्ये सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे या गावाची जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज पाहणी केली या पाहणी दरम्यान गावामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देश ठाकूर यांनी दिले आहेत तसेच नाला रुंदीकरण करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले गावातील पूरग्रस्तांना योग्य ती मदत लवकरच दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी या भेटीदरम्यान दिले