प्रतिनिधी, चादवड : चांदवड तालुक्यातील वडबारे येथील मोबाईल नेटवर्क चालू झाल्यापासून ते आज पावेतो मोबाईल नेटवर्क व ऑनलाईन सुविधा मिळत नसल्याने आमच्या गावात कुठलेही आपत्कालिन घटना घडली तर आम्हाला मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे आमच्याकडे आरोग्य विभाग पोलीस यंत्रणा अन्य प्रकारचे प्रशासनाला प्रचारण करण्यापासून अलिप्त राहावे लागत आहे. तसेच सध्या दोन वर्षापासून करुणा महामारी च्या आजाराने थैमान घातले असून त्यामध्ये त्यामध्ये सर्वत्र शाळा-कॉलेज हीदेखील बंद असल्याने मात्र शासनाने ऑनलाईन अभ्यास दिला तो अभ्यास देखील आम्हाला आमच्या गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे करता येत नसत नाही याचे गांभीर्य लक्षात घेऊन चांदवड तहसीलदार यांनी व दूरध्वनी कार्यालयाने याची दखल घेऊन आम्हाला मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी निवेदनावर संकेत जाधव सचिन जाधव अविनाश जगताप महेश जाधव बाळकृष्ण जाधव नवनाथ जाधव समाधान जाधव आदींच्या सह्या असून तर यावेळी नामदेव थोरात यांनी अधिक माहिती दिली
