जनतेज न्युज

चांदवड प्रांताधिकारी कार्यालयावर किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा संपन्न

प्रतिनिधी , नाशिक : चादवड ॲकर चांदवड तालुका किसान सभा सी आय टी यु जनवादी महिला संघटना शेत मजुर संघटना डी वाय एफ आय सर्व संघटनेच्यावतीने मागण्यांसाठी मोर्चा आज तारीख तीन ऑगस्ट 2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून काढण्यात आला मोर्चा बस स्थानक बाजार तळ सोमवार पेठ शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला या मोर्चामध्ये विविध घोषणा देत मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड हनुमंत गुंजाळ कॉम्रेड तुकाराम गायकवाड शब्बीर सय्यद सारिका गुंजाळ राजाराम ठाकरे भाऊसाहेब मोरे गणपत गुंजाळ ताईबाई पवार नामदेव पवार देवाजी कुवर नंदाबाई मोरे सुरेश चौधरी रूपचंद ठाकरे आदी सह महिला व पुरुष सामील झाले यावेळी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात चांदवड देवळा तालुक्यातील वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे चांदवड देवळा तालुक्यातील वन जमिनीचे यांना प्रमाणपत्र मिळाले आहेत ताब्यात असलेली संपूर्ण जमीन मोजून सातबारा लावण्यात यावी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सन 2015 पासून आज पर्यंत जमा केलेल्या फाईलचे नावासह यादी मिळावी चांदवड देवळा येथे जातीचे दाखले शाळेतील मुलांसाठी गेम लावून देण्यात यावे ज्या लोकांच्या ताब्यात वन जमिनी नाहीत अशा लोकांचे बोगस प्रमाणपत्र तयार झालेले आहेत तलाठी यांनी त्याची पाहणी न करता सातबारा तयार करून दिले आहेत तरी ते त्वरित चौकशी करून सातबारा रद्द करण्यात यावा अशा विविध मागण्यांचे प्रांत अधिकारी चंद्रशेखर यांच्यासमोर मांडण्यात आल्या यावेळी कॉम्रेड हनुमंत गुंजाळ यांनी अधिक माहिती दिली