प्रतिनिधी ,उस्मानाबाद: विधानसभा निवडणुकीपुर्वी दिलेल्या शब्दानुसार प्रचलीत नियमाप्रमाणे १०० टक्के वेतन अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसह कायम विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांच्या विवीध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत शाळा कृती समीतीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले . या वेळी पुणे शिक्षक मतदार संघातील माघार व पदविधर तसेच शिक्षक मतदार संघातील महा विकास आघाडीला मदत केल्याची आठवण करून देत १५ अॅगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास शिक्षक , पदविधर आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे
