प्रतिनिधी , आतापर्यंत जप्त केलेल्या आलिशान गाड्यांमध्ये रोल्स रॉयल, मर्सडिझ, रेंज रोवर, पजेरो अशा विविध कोट्यवधी किमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.. पोलिसांनी कारवाईचा फास आवळताच गायकवाडने लोकांकडून लुबडलेला अफाट खजिना समोर येऊ लागला आहे.. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन बळजबरीने स्वत:च्या व कुटुंबातील व्यक्ती च्या नावाने करून घेणं हा गायकवाडचा मुख्य व्यवसाय असल्याचे आता पुढे येत आहे..
आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ “औंधचा भाऊ” याच्यासह त्याचा मुलगा गणेश नानासाहेब गायकवड आणि साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणीपद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. गायकवाड याच्यावर मोकाची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या अनेक क्रुर कहाण्या जगासमोर येऊ लागल्या आहेत.
नानासाहेब गायकवाड हे चिंचवड चे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. दरम्यान, गणेश गायकवाड हा कॉंग्रेसचा पदाधिकारी होता. त्यास पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा गणेश गायकवाड याच्या कृत्याने उद्योगजगत व राजकारणात खळबळ माजवली आहे. अफाट पैसा व इस्टेट कमावून देखील मुलाला आमदार व मंत्री करण्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे अनेक दृष्कृत्ये तसेच क्रुरकहाण्या जगासमोर येऊ लागल्या आहेत.
