जनतेज न्युज

भाजीपाला दर गडगडल्याने शेतकऱ्यांसोबत विक्रेतेही आर्थिक संकटात

प्रतिनिधी , नाशिक :सद्यस्थितीत तालुक्‍यासह सर्वत्र भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत.यामुळे आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
भाजीपाल्याची आवक वाढून दर घसरल्याने बाजारात मंदी पसरली असून खरेदी केलेला माल विकणेही अवघड बनले आहे.तालुक्यात सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते.स्थानिक बाजारपेठेत सोबतच महाराष्ट्र आणि गुजरातच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये भाजीपाला पाठविला जातो.स्थानिक पातळीवरही भाजीपाल्याची विक्री होते.गेल्या पंधरवड्यापासून भाजीपाल्याचे दर मात्र प्रचंड गडगडले आहेत.साहजिकच यामुळे हजारो रुपयांचे भांडवल गुंतवलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे.एवढेच नव्हे तर हा भाजीपाला विक्री करणाऱ्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांचेदेखील भलतेच वांदे झाले आहेत.याबाबत सटाणा शहरातील तरुण भाजीपाला विक्रेता विकी जाधव याने समव्यावसायिकांचे दुःख अशा तऱ्हेने व्यक्त केले.