प्रतिनिधी , सातारा : राज्यातील सहकारी साखर कारखाने मोडीत काढून सत्ताधारी राजकारणी ते कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन स्वतः ची संपत्ती करत आहेत . येत्या काळात सातारच्या जरंडेश्वर साखर करखान्यातला घोटाळा बाहेर काढण्यासाठी मी 5 ऑक्टोबर रोजी जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार असे मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केले आहे
कोल्हापूर येथील नेते हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणाबद्दल ते आज सताऱ्यातून कोल्हापूर येथे निघाले आहेत त्या वेळी जरंडेश्वर कारखान्याच्या शेतकऱ्यांना त्यांची भेट घेतली व कारखान्यातील घोटाळ्याचे कागत किरीट सोमय्या यांना दिले त्यावेळी त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 5 ऑक्टोबर रोजी सातारच्या जरंडेश्वर कारखान्याला भेट देतो असे आश्वासन दिले
