जनतेज न्युज

लोकांना १० दिवस पुरेल इतक्या अत्यावश्यक वस्तू मोफत द्या – चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी , पुणे : महाराष्ट्रात एकूणच कोरोनाचे संकट नियंत्रणात येत असतानाच मुंबई व परिसर, पुण्यात मात्र हे संकट अधिकच वाढत चालले आहे. आज पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७०० वर गेली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या काय उपाययोजना सुरू आहेत याची माहिती घेण्यासाठी, काही सूचना करण्यासाठी, सहकार्याचा हात पुढे करण्यासाठी आज भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काही सूचना प्रशासनाला दिल्या.

शहरातील ज्या भागांमध्ये रुग्ण सापडत आहेत त्या भागात अत्यंत कडक सुरक्षा उभी करावी. लोकांनी १० दिवस घराच्या बाहेर पडू नये यासाठी प्रशासनाने दूध पावडरसहित (जेणेकरून दुधासाठी बाहेर पडू नये) धान्य व किराणा सामानासारख्या अत्यावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करावे. ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसत नसतानाही कुटुंबीयांच्या संमतीने जवळच्या शाळा, मंगल कार्यालये, लॉजेस, हॉटेल्समध्ये स्थलांतरित करावे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार परंतु रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधे नागरिकांना वाटावीत. अशा सूचना त्यांनी केल्या व सर्व प्रकारच्या सहकार्याची तयारी दर्शवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.