प्रतिनिधी , बुलडाणा (शेगाव) : एका धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकानं ६४ वर्षीय मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक केलीय. मेरठमधून सिद्दीकी यांना काही दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं होत. मौलाना कलीम सिद्दीकी हे ‘ग्लोबल पीस सेंटर’चे अध्यक्ष आहेत. तसंच ते ‘जमीयत – ए – वलीउल्लाह’ चेही अध्यक्ष आहेत. त्यांच्या अटकेवरून संपूर्ण भारतात वादंग उठले असून त्यांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी विविध राजकीय पक्षासह संघटनांकडून करण्यात येत आहे.यामध्ये आज बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात तहफ्फुस ए शरियत कमिटी च्या नेतृत्वात विविध राजकीय पक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले..
उत्तर प्रदेश मधील मुस्लिम समाजाचे आयडल मानल्या जाणारे मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर तेथील पोलिसंनी जाणीवपूर्वक अटकेची कारवाई केली असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, आणि तेथील सरकारने तात्काळ माफी मागावी अशी मागणी करणारे निवेदन आज शेगावात तहफ्फुस ए शरियत कमिटी च्या नेतृत्वात विविध राजकीय पक्षांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, एमआयएम, प्रहार संघटना, बामसेफ, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल आदी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
