जनतेज न्युज

औरंगाबाद,घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर यांचे शैक्षणिक शुल्क माफी साठी आंदोलन

प्रतिनिधी , औरंगाबाद:-आज शुक्रवार 1 ऑक्टोंबर रोजी घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर अचानकपणे संपावर गेले आहेत,
निवासी डॉक्टरांनी कोरुना काळामध्ये केलेल्या कामाचा मोबदला म्हणून शासनाने शैक्षणिक शुल्क माफ करावी अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली होती,
मात्र यावर ती राज्य शासनाने अजून पर्यंत कोणताच निर्णय घेतला नाही म्हणून आज निवासी डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात संप पुकारला आहे,
सदरील शिक्षण शुल्क माफ करण्यात यावा अशी मागणी निवासी डॉक्टरांची असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज धरणे आंदोलन करून सर्व निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.
दोन वर्ष निवासी डॉक्टरांनी करूणा काळामध्ये कार्य केले असून यानंतर शिक्षणिक मोठ्या प्रमाणात नुकसान निवासी डॉक्टरांची झाले आहे सदरील शिक्षण न घेता अरुणा काळात मोठे कार्य निवासी डॉक्टरांना करावे लागले,
यामुळे निवासी डॉक्टरांनी शिक्षण शुल्क माफ करण्याची शासन दरबारी मागणी केली होती,
मात्र अजून पर्यंत राज्य शासनाने यावर ती कोणताच निर्णय घेतल्याने आज गाडीतील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.