प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकाला तल्याच स्वरूप आलंय. परिणामी प्रवाशांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. राज्यातील तत्कालीन युतीच्या सरकार मध्ये या बस स्थानकाच तब्बल तीन वेळा उद्घाटन झाले माञ याची परिस्थिती जैसे थेच आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकातून दररोज हजारो एसटीच्या फेऱ्या होतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी वर्दळ असते, परंतु पावसाळयात याठिकाणी प्रवाशांना उभं राहणं देखील कठीण झालंय. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने बस स्थानकाला तल्याचं स्वरूप आले असून या पाण्यातून प्रवाशांना वाट शोधावी लागतेय. केवळ अडचणीच नाही तर प्रवाशांना मणक्याचे त्रास होत असल्याचं प्रवासी सांगत आहेत.
तत्कालीन युती सरकारच्या काळात या एसटी स्थानकाचे तब्बल तीन वेळा थाटात उद्घाटन झाले, परंतु सध्या केवळ कोविडच कारण पुढे करत याचे काम रोखण्यात आलं, प्रत्येक पावसाळ्यात थातूर मातूर अंतर्गत रस्त्याची डागडुजी करून हा रस्त्या केला जातो. माञ परिस्थिती कायम आहे. एकूण 2 हेक्टर 29 आर जमीन बस स्थानकासाठी आरक्षित आहे. तर 25 कोटीचं कंत्राट मंजूर असून हे काम सध्या ठप्प आहे.
