जनतेज न्युज

सोलापूरात शिवसेनेची पोस्टारबाजी……

प्रतिनिधी, सोलापुर : खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ सोलापुरातील शिवसैनिक सरसावला असून त्यांनी शहरातल्या मध्यवर्ती असणाऱ्या नवी पेठ परिसरात संजय राऊत यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स लावत पोस्टरबाजी केलीय.मोदी-शहांच्या भाजप सरकारकडून सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा राजकीय दबवतंत्रासाठी वापर होत आहे.केवळ भाजपेत्तर राजकीय पक्षांच्या नेत्यांना केंद्र सरकार लक्ष्य करत आहे.

त्याचा गौप्यस्फोट करण्यासाठी खासदार संजय राऊत हे आज मुंबईत  पत्रकारपरिषद घेत आहेत.त्यानिमित्ताने शिवसेना भावनांत जय्यत तयारी करण्यात आलीय,तर महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात शिवसैनिकांकडून संजय राऊत यांच्या भूमिकेचे पोस्टर लावले जाता आहेत.भाजप नेते हे किरीट सोमय्या हे उभारलेल्या संजय राऊत यांच्या पायाखाली आल्याचे पोस्टरमध्ये दाखवण्यात आलंय.