जनतेज न्युज

. भाजपा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन.

प्रतिनिधी, धुळे : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी धुळे काँग्रेस ने खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या घराबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच खासदार डॉ सुभाष भामरे आणि पीएम मोदींनी माफी मागावी, अशा प्रकारची घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण  धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर टीका केली होती. तसेच महाराष्ट्र कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरला त्यामुळे देशात कोरोना पसरला, असा दावा नरेंद्र मोदींनी केला होता. याविरोधात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आंदोलन पुकारल्या नंतर धुळ्यात देखील त्याचे पडसाद उमटले आहे. यावेळी धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील तसेच धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी नगरसेवक युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे नगरसेवक साबिर शेख आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व खासदार सुभाष भामरे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी