प्रतिनिधी, जळगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाटीलकीची भाषा वापरण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा असे म्हणत चंद्रकांत पाटलांचा टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रतिउत्तर दिले.
प्रत्येकाला भाषा वापरण्याचा अधिकार आहे. पाटील तर सर्व आहेत,शिवराळ भाषेचा वापर करण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
