प्रतिनिधी, अमरावती : महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ कायद्यात बदल केल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो व त्यानंतर त्यामध्ये भ्रष्टाचार वाढणार असून विद्यापीठामध्ये राज्यपालाकडून थेट कुलगुरूंची नियुक्ती या नवीन कायद्यामध्ये होणार आहे सोबतच विद्यापीठांमध्ये कुलपती पदावर एक पद निर्माण करण्यात येणार असून ते पद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे नियुक्त करणार असल्याने आता विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होणार आहे,त्यामुळे तो हस्तक्षेप होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कडून आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ समोर छात्र आसूड आंदोलन करण्यात आले ,यावेळी विद्यार्थ्यांनी बैलबंडी घेऊन विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन केले.
