प्रतिनिधी, वर्धा : युक्रेन मध्ये अडकलेला हिंगणघाटचा यश मोटवानी भारतात सुखरुप दाखल झाल्याने हिंगणघाट मध्ये आनंद व्यक्त होत आहे. रशियाने यूक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती मुळे विमान सेवाही बंद झाली होती तेथे वैद्यकिय शिक्षण घेत असलेला हिंगणघाट येथील यश विनोद मोटवाणी हा युवक अडकून पडला होता.
व्हॉईस – डेनप्रो येथील वैद्यकीय महाविद्यालयात तो शिक्षण घेत आहे, डी २ ओडेसा हे तेथील जवळचे विमानतळ आहे. हिंगणघाट येथील यश हा सुद्धा युद्धाच्या परिणामामुळे मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात असताना यूक्रेन येथील ओडीसा एअरपोर्ट वरती पोचण्याच्या प्रयत्नात होता परंतु दुर्दैवाने काही वेळातच विमानसेवा बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्याला यूक्रेन प्रशासनातील अधिकाऱ्यांतर्फे ओडेसा येथेच भाड्याचे घर घेऊन राहण्याचा सल्ला देण्यात आला. ४-५ भारतीय तरुणांसह तो ओडेसा येथेच थांबला होता. ओडेसा येथुन आपल्या छत्तीसगढ व रायपूरच्या मैत्रिणीसह तसेच एका मित्रासह ओडेसा ते रोमानिया असा ६०० किमि. चा प्रवास धाडसाने खाजगी वाहनाने पूर्ण करून तो रोमानियाच्या सिमेवर पोहचला पण तेथे सिमेवर वाहनांची गर्दी वाढल्याने वाहन चालकाने त्यांना १० किमि आधीच उतरवून दिले. अखेर कडाक्याच्या थंडीत जिव पणाला लाउन त्यांनी पायदळ रोमानियाची सिमा पार करुन स्वतःला सुरक्षित करुन घेतले.
