प्रतिनिधी, उसमानाबाद : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत प्रसिद्ध आहे . खास शर्यतीसाठी शेतकरी लाखोंची बैलजोडी घेऊन सांभाळतात त्यांचे बैलगाडा शर्यत आखाड्यावर अर्थकारण अवलंबुन असत . आज प्रथमच मराठवाड्यात आई तुळजाभवानीच्या तुळजापुर नगरीत हा बैलगाडा शर्यत आखाडा शिवबाराजे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत केले आहे . या शर्यतीसाठी फलटन , माळशिरस , पंढरपुर , कोल्हापुर आदी ठिकाणाहुन ७० ते ९० बैलगाडा चालक सहभागी झाले आहेत .थोड्याच वेळात हा थरार पहावयास मिळणार आहे .
