जनतेज न्युज

मिरज शहरात गोसावी समाजाची अनोखी होळी

प्रतिनिधी, सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात गोसावी  समाजाची  अनोखी  होळी पाहायला मिळते,  या होळी सण साझरा करत असताना, झेंड्याचा खेळ – खेळला जातो आणि तेंव्हा महिला काठ्याने पुरुषान मारतात.

या समाज्यात  होळी नंतर तिसऱ्या दिवशी  झेंड्याचा खेळ – खेळला जातो. पुरुषांनी तो झेंडा पळवन्याचा प्रयत्न करतात. तर  महिला, पुरूषांना झेंडा पळवून न्हेंण्यापासून रोखतात. यावेळी पुरुष  मंडळीना पिटाळून लावण्यासाठी  महिला पुरुषाना काठीने बदडून काढतात.महाराष्ट्रातील गोसावी  समाज  मोलमजुरी  करून  आपली उपजीविका चालवतो. हा  समाज  धार्मिक  स्वरूपाचा  असल्यामुळे  हिंदू  सण  समारंभ लोक मोठ्या श्रद्धेने  साजरे  करतात.होळीच्या  दिवशी पुरुष मंडळीना  काठीने  मारण्याची परम्परा  गोसावी  समाजात वर्षानुवर्ष चालत आली आहे.या गोसावी समाज्यात  होळी  नंतर तिसऱ्या दिवशी  झेंड्याचा खेळ – खेळला जातो,  ज्या ठिकानी होळी पेटवली जाते त्याच ठिकाणी  गल्लीच्या  मध्यभागी झेंडा  बांधला जातो. आनी तो झेंडा पकडून  सर्व महिला उभ्या असतात.  पुरुष तो झेंडा पळवन्याचा खुप वेळा प्रयत्न करतात. तर  महिला, पुरूषांना झेंडा पळवून न्हेंण्यापासून रोखतात. यावेळी पुरुष  मंडळीना पिटाळून लावण्यासाठी  महिला पुरुषाना काठीने बदडून काढतात. तरीही युवकांनी झेंडा पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी  महिलांनी  पुरुषांना काठीने चोप दिला.

आजच्या खेळात महिला जिंकल्या.