प्रतिनिधी, औरंगाबाद : खाद्यतेल तसेच इतर वस्तू च्या किमतीत होत असलेली अफाट वाढ औद्योगिक नगरी वाळूज येथील जन सामान्य जनतेच्या खिशाला चांगलीच कात्री लावत आहे खाद्य तेलाच्या किमतीत एका किलोमागे 50 ते 60 रुपये वाढल्याने हॉटेल व्यवसायिकांनाही तळलेल्या पदार्थ विक्रीच्या किमतीत वाढ करावी लागत असल्याने ग्राहक पदार्थ खरेदी करण्याकडे हिरमोड करत आहेत त्यामुळे औद्योगिक नगरीतील हॉटेल व्यवसायिकांनाही महागाई ची चांगलीच झळ पोहोचत आहे तर घरातील बजेट सांभाळणाऱ्या सामान्य गृहिणींना वाढलेल्या महागाईमुळे काटकसर करून राहावे लागत आहे.
