जनतेज न्युज

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकेल – खा अनिल देसाई

प्रतिनिधी, नांदेड : गेली दोन दिवसापासून शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई हे शिवसेना संपर्क अभियाना साठी नांदेड दौऱ्यावरती आले होते त्यांनी आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद घेतली पत्रकारांशी ते बोलताना म्हणाले की मुंबई महानगरपालिका वरती शिवसेनेचा भगवा फडकणार तसेच आम्ही कुठल्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असताना पाठीशी घालत नसून भारतीय जनता पार्टी ने आम्हाला हिंदुत्व शिकू नये हि शिवसेना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे व नांदेड जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आमच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये पाहण्यात आले आहे व यासाठी मी नितीन गडकरी ची भेट घेऊन निवेदनाद्वारे होणाऱ्या कामासंदर्भात रीतसर कारवाई करावी अशी देखील मागणी करणार आहे व जे पक्ष सोडून गेले आहेत अशा काही निष्ठावान शिवसैनिकांची पक्षांमध्ये परत येण्याची इच्छा आहे पण उद्धव साहेब ठाकरे हा निर्णय घेतील त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल असे ते म्हणाले.