प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद,वेरूळ येथील बारावे ज्योतिलिंग घृष्णेश्वराचे पुजारी असणारे ज्येष्ठ रंगकर्मी स्व. राजाभाऊ दांडगे यांचे घर म्हणजे कलाकारी क्षेत्रात मुशाफिरी करणारे घर. पाच मुली, एक मुलगा आणि राजाभाऊंची आई असे नऊ माणसांचं कुटुंब, प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत. कुणी खेळात, कुणी गाण्यात तर कुणी पाककलेत तरबेज. सर्वात मोठ्या शोभा दांडगे यांनी वडिलांचा वारसा उचलला. तर मुलगा शरद दांडगे यांनी आजोबांच्या वादन कलेचा वारसा सुरू ठेवलाय. शोभा दांडगे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. व्हिडिओकॉन कंपनीतील कामगार ते आज आघाडीच्या नाट्यकर्मी, सिनेअभिनेत्री म्हणून त्या गाजताहेत. विविध मालिकांमधून त्यांच्या भूमिका गाजताहेत. एवढे सर्व करून आजारी त्या आपल्या राहत्या घरी गायनाचे क्लास नाट्याचे क्लास हे सुद्धा त्या घेत आहेत,त्यांच्याशी साधलेला हा संवाद:
स्नेहसंमेलनाआधी मी घरच्याच मेळ्यामध्ये काम सुरु केले. माझे आजोबा (वडिलांचे मामा) म्हणजे प्रसिद्ध शहनाई वादक बाबुरावजी गुरव आणि प्रभाकरराव गुरव, माझे वडील राजाभाऊ यांचा मेळा होता. त्याचे नाव “संस्थान गणेश मेळा”. यातून अभिनयाला सुरवात झाली. त्याकाळी मेळयांना खूप महत्त्व होते. मी वडिलांसोबत दररोज तालमीच्या ठिकाणी जात होते,एकदा गणपतीत लोकनाट्यासाठी वडिलांनी त्यांच्या तालमीमध्ये नेले. कारण एक मुलगी वेळेवर भूमिका करण्यास नाही म्हणाली. गणपती अवघ्या दोन दिवसांवर आलेले आणि अशा वेळी वडील म्हणाले “चल तर खरी… बोलून बघा मी काम करण्याची तयारी दर्शवली, इथून माझा प्रवास सुरू झाला. १९८७ मधील गणपती उत्सवात विश्वास साळुंके यांच्या “पैशाला अनेक वाटा या लोकनाट्यात पहिल्यांदा हौशी रंगभूमीवर मी पाऊल ठेवलं. १९८७ ते २०२२ पर्यंतचा ३५ वर्षांचा हा कालखंड नाटक, सिनेमा व मालिकांमुळे माझे जीवन समृद्ध झालंय असं वाटतं आपण कोणत्या नाटकात चित्रपटात काम केले वआपल्या कोणकोणत्या भूमिका गाजल्या?
शोभा दांडगे म्हणाल्या ‘इथे ओशाळला मृत्यु या नाटकातील येसूबाई, सूर राहू दे’मधील बेलाचा मूक अभिनय, “झगडा” मधील झुमकी, पैशाला अनेक वाटारमधील गोजी, विच्छा माझी पुरी करा, या लोकनाट्यातील मैनावती, पुन्हा एक गांधारी मधील आंधळी मुलगी, आपला एखाद्या अनुभव ‘यात्राएका नाटकातील दृश्य.आणि यात्रा’मधील वंदना एका दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पत्नीची भूमिका, गांधी कधी येणार या नाटकातील नुसरत या भूमिका त्या काळी अतिशय गाजल्या. ‘हक्क’ चित्रपटातील नक्षलवादी स्त्रीची भूमिकाही गाजली. दृष्टी हा चित्रपट मी केला होता हा चित्रपट माझा भाऊ शरद व त्याच्या मित्रांनी दिल्ली तयार करण्यास सुरुवात केली होती पण तो डब्यातच गुंडाळला गेला त्यामुळे कधी येणारच नाही.
असे वाटते ,
टीव्ही मालिकातील भूमिकाविषयी सांगा? शोभा दांडगे म्हणाल्या दोन किनारे दोघी आपण १७६० सासूबाई, अस्मिता, सीआयडी, कट्टी बट्टी, नवरी मिळे नवन्याला या मालिकांमध्ये काम केलं. गोरथ्या, तिसरी आझादी या हिंदी चित्रपटांत व अंतिम सत्य, लढा नामांतराचा या मराठी चित्रपटांत काम केले.शो मस्ट गो ऑन, ही शिकवण मला माझ्या गुरुजनांकडून मिळाली आणि आजही या शिकवणुकीचे मी पालन करते. कोरोना काळामुळे संध्या मी मुंबईत न राहता औरंगाबादला माझ्या घरीच राहत आहे पुन्हा एकदा कामाला सुरुवात करत आहे. आठ ते दहा दिवसांमध्ये माझी मालिका चित्रपटाला सुरुवात होणार आहे असे अभिनेत्री नाट्यकर्मी शोभा दांडगे यांनी यावेळी बोलताना सांगितलेत्यांचे बंधू शरद दांडगे यांना पंचम नांद वादनामध्ये अनेक पारितोषिक मिळालेले आहे.
