प्रतिनिधी, नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास साडेसहा हजार हेक्टर वरती शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन ची निर्मिती केली असून हे सोयाबीन बियाणे म्हणून वापरले जाते व यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो जवळपास एक लाख क्विंटल सोयाबीन बियाणे या शेतीमधून होणार असून या बियाणे चा फायदा पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होईल जवळपास शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयांचे बियाणे तयार केले आहे व उर्वरित बियाणं शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल तसेच शेतकरी या बियाण्यापासून आपली शेती करू शकतात व या गोष्टीचा शेतकऱ्यांना आनंद होत आहे तरी शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी माहिती पत्रकारांशी बोलताना कृषी अधिकारी रविशंकर चलवादे यांनी ही माहिती दिली.
