जनतेज न्युज

तापमानाचा पारा वाढताच लिंबाचा भाव पोहचला 200 रु.किलो वर.

प्रतिनिधी, रत्नागिरी : संपूर्ण राज्यात तापमानाने उचांक गाठला आहे परिणामी त्याचा फटका लिंबू दर वाढीवर आणि विक्रीवर झाल्याचे झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सातत्याने होणाऱ्या तापमानाच्या वाढी मूळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. वाढत्या उष्म्यामुळे उत्पादनात घट होत असून लिंबाचे दर हे भरमसाठ वाढले असून लिंबू हे चक्क 200 रु.वर पोहचले आहे एरवी 1ते 2रु. ला मिळणारे लिंबू आत्ता 15 ते 20 रु. मिळत आहे. त्यामुळे भर उन्हात शरीराला स्पुर्तीदायक असणारे व सर्वसामान्यांना परवडणारे लिंबूसरबत देखील महाग झाले आहे.त्यामुळे लिंबू खरेदीवर त्याचा परिणाम झाला असून लिंबूसरबत विक्रेते, व इतर व्यावसायिक हैराण झाल्याचे दिसत आहे.