जनतेज न्युज

जुलमी महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्यासाठी रयत क्रांती संघटना 5 लाख पत्र केंद्र सरकारला लिहिणार ..!

प्रथिनिधी, सोलापूर : काल सोलापूर जिल्ह्यामध्ये रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून भ्याड हल्ला केला, याचा रयत क्रांती संघटना जाहीर निषेध करत आहे. वास्तविक पाहता पत्रकारांच्या समोर पोलिसांच्या समोर लोक प्रतिनिधी वरती हल्ला करणे हे लोकशाहीला घातक असून हिटलरशाही चे प्रतीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आत्तापर्यंत शेतकरी आंदोलन चिरडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, आज आतापर्यंत शेतकरी आंदोलनात 40 शेतकरी यांना यांनी गोळ्या घातल्या आहेत. आणि आता तर महाविकास आघाडीतर्फे लोकप्रतिनिधींच्या वरतीच कार्यकर्त्यांच्या मार्फत हल्ला करण्याचा सपाटाच जणू चालू आहे. परंतु रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत व रयत क्रांती संघटना या भ्याड हल्ल्याला न घाबरता जनतेच्या प्रश्नावर ती नेहमीच आवाज उठवत राहील. गेली 40 वर्षापासून शेतकरी चळवळीपासून शेतकऱ्यांचे मजुरांचे व येथील सर्व घटकांचे प्रश्न शासन प्रशासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचे काम आमदार सदाभाऊ खोत साहेब करत आहे. करत होते व करत राहणार. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये गृहखाते असते तेव्हा तेव्हा अशा प्रकारे गुंडगिरीला चालना मिळते हा इतिहास आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी विकासाचे मुद्दे न घेता एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, लघुउद्योजकांची प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नावर ते अपेशी ठरले असताना केवळ सत्ता टिकवण्यासाठी व मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मार्फत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी वरती रोज हल्ले होत आहेत. म्हणून रयत क्रांती संघटनेतर्फे 25 मे 2022 पासून 5 लाख पत्र केंद्र सरकारला पाठवण्याचे अभियान चालवणार आहे. या पत्रामध्ये महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली असून विकास कामे ठप्प झालेली आहेत जनतेचे अतोनात हाल होत असून महाविकास आघाडी सरकार हे फक्त टीव्हीत बसून व घरात बसून सरकार चालवत आहे व रोज लोकप्रतिनिधीवरती महाविकास आघाडी सरकार मधील पक्षातील कार्यकर्ते हल्ला करत आहेत. म्हणून महाराष्ट्रातील सरकार त्वरित बरखास्त करा व महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशा प्रकारचे 5 लाख पत्र रयत क्रांती संघटनेतर्फे महाराष्ट्रातून केंद्र सरकारला येत्या 25 मे 2022 पासून पाठवण्याचे अभियान चालू करणार आहे.