प्रतिनिधी, रत्नागिरी : राज्यातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी. कारण राज्यात ऑईल कंपन्यांकडून अचानक इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यातील मुंबईसह दोन हजार पेट्रोल पंपावर सध्या इंधन तुटवडा जाणवत असल्याची माहिती फामपेडा( फेडरेशन आँफ महाराष्ट्र पेट्रोल डिझेल डिलर्स असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. भारत पेट्रोलियमच्या सर्वच डेपोंवर पेट्रोल आणि डिझेल शॉर्टेज आहे. कंपन्यांनी पेमेंट्सच्या टर्म अचानक बदलल्या आहेत.ऑइल कंपन्या देत असलेली कारणं लॉजिकल वाटत नाही आहेत असं ही उदय लोध यांनी स्पष्ट केले आहे. पैसे देऊन सुद्धा पेट्रोल पंप चालकांना भारत पेट्रोलियममध्ये माल मिळत नाही आहे. त्यामुळे उद्या शनिवार आणि रविवारी इंधनाचा तुटवडा आणखी जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
